Tarun Bharat

कर्नाटकमधील शाळा, महाविद्यालये ३१जुलैपर्यंत बंद राहणार

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी


कर्नाटकात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. प्रशासनासाठी ही चिंतेची बाब आहे. वाढत धोका लक्षात घेऊन राज्यसरकार कठोर पावले उचलताना पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या अनलॉक २ मध्ये काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांच्या अनुषंगाने कर्नाटक सरकारने मंगळवारी राज्यभरातील शाळा, महाविद्यालये, सिनेमा हॉल, मल्टीप्लेक्स, जलतरण तलाव, मेट्रो सेवा, विवाह मंडळे आणि जिम हे सर्व 31 जुलैपर्यंत बंद राहतील असे जाहीर केले आहे. तसेच अनलॉक २ मध्ये कर्नाटकवासीयांना कोणतीही शिथिलता दिलेली नाही. परंतु आवश्यक सेवा आणि इतर शहरांमधून येणाऱ्यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

राज्याचे मुख्य सचिव टीएम विजय भास्कर यांनी हे आदेश जारी केले आहेत. गृहमंत्रालयाने सोमवारी रात्री उशिरा जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये काही सूट दिली असली तरी कर्नाटक सरकारने गेल्या दोन आठवड्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तसेच अनलॉक १ अंतर्गत देण्यात आलेल्या सवलती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर सरकारने कंटेनमेंट झोनमध्ये लागू असलेल्या अटी कायम ठेवल्या असून याठिकाणी फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात अली आहे.

Related Stories

कडोली दूरदुंडेश्वर मठाच्या जीर्णोद्धाराचा निर्णय

Amit Kulkarni

नवीन बीपीएल रेशनकार्डचे काम ठप्पच

Omkar B

सरस्वती हायस्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात

Patil_p

शहरातील शाळांमध्ये पुन्हा उत्साह

Patil_p

शहरातील धोकादायक बसथांब्यांकडे मनपाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

गौरी लंकेश हत्या प्रकरणी मुरली ची बेळगावात चौकशी

Tousif Mujawar
error: Content is protected !!