Tarun Bharat

कर्नाटकमध्ये कोरोना परिस्थिती गंभीर, गुरुवारी ५०३० नवीन रुग्णांची भर

बेंगरूळ/प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये कोरोना दररोज उच्चांक गाठताना पाहायला मिळत आहे. दररोज बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी राज्यत परिस्थितीत आणखी गंभीर बनत चालल्याचे दिसले. गुरुवारी चोवीस तासात ५०३० नवीन रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर बेंगळूरमध्ये कोरोनाचे २२०७ नवीन रुग्ण आढळले आहेत.

राज्यात गुरुवारी एकूण ९७ कोरोना-संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. तर एकट्या बेंगळूरमध्ये ४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात कोरोनाचे एकूण सक्रिय रुग्ण गुरुवारी वाढून ४९९३१ वर पोचले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांतील २०७१ कोरोनातून मुक्त झालेल्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, ही दिलासाची बाब आहे. बेंगळूरमध्ये १०३८ लोक बरे झाले आणि घरी परतले.

बेंगळूरमधील एकूण सक्रिय प्रकरणे २९०९१

गुरुवारी, बेंगळूर शहरी जिल्ह्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २९०९१ वर गेली. बेंगळूरमध्ये कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ७८३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

भ्रष्ट 15 अधिकाऱयांवर छापे

Patil_p

खासबाग आठवडी बाजारात रस्त्याच्या मध्यभागी गाळे

Amit Kulkarni

कडाक्याच्या थंडीनंतर उष्म्यात वाढ

Patil_p

शनिवारी ‘त्या’ न्यायाधीशांविरोधात पुन्हा दलित संघटनांचे आंदोलन

Patil_p

कर्नाटकात पहिले लांडग्यांसाठी वन्यजीव अभयारण्य होण्याची शक्यता

Archana Banage

नव्या मंत्र्यांच्या नावांची आज होणार घोषणा

Amit Kulkarni