Tarun Bharat

कर्नाटकमध्ये मागील तासात १ हजार ६६९ नवीन रुग्ण, तर २२ मृत्यू

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये दोन दिवसांच्या रुग्ण वाढीनंतर शुक्रवारी नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट झाली. राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे १,६६९ नवीन रुग्ण आढळले आहेत. याचवेळी १,६७२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर २२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या २२,७०३ सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत २९,२६,४०१४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी २८,६६,७३९ जण कोरोनमुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे ३६,९३३ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने शुक्रवारीदिली आहे.

बेंगळूर शहरी जिल्ह्यात शुक्रवारी ४२५ नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर शहरात ४२४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिह्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकारात्मकता दर ०.९८ टक्के होता, तर केस मृत्यू दर (सीएफआर) १.३१ टक्के होता.

Related Stories

कर्नाटकातील फास्टर बोटी राज्याच्या हद्दीत

Archana Banage

‘या’ अभिनेत्रीच्या आठवणीत गुगलचे खास डूडल ; सहाव्या वर्षी मिळवला होता ऑस्कर

Archana Banage

मध्य प्रदेश : उद्या रात्रीपासून इंदौर – भोपाळमध्ये नाईट कर्फ्यू

Tousif Mujawar

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी सदावर्तेंना जामीन मंजूर

Archana Banage

सांगली-कोल्हापूर एसटी हाऊसफुल्ल

Abhijeet Khandekar

माने वहिनी, यड्रावकर यांना किंमत मोजायला लावू

Archana Banage