Tarun Bharat

कर्नाटकमध्ये रुग्णवाढीचे सत्र सुरूच, शुक्रवारी ५ हजाराहून अधिक बाधित

बेंगळूर/ प्रतिनिधी

कर्नाटकात गुरुवारीच्या तुलनेत शुक्रवारी कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे, परंतु अद्यापही दररोज पाच हजारांहून अधिक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. शुक्रवारी, ५,४८३ नवीन रुग्णांची भर पडली. तर ८४ जणांचा मृत्यू झाला असून ३,१३० रूग्णांना कोरोनमुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. राज्यात गुरुवारी ६,१२८ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली होती. गुरुवारी एकाच दिवसात सर्वाधिक कोरोनाची नोंद झाली.

आतापर्यंत राज्यात एकूण बाधित रूग्णांची संख्या १,२४,११५ वर पोहोचली आहे. ७२,००५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एकूण ४९,७८८ रुग्ण कोरोनावर मात करण्यास यशस्वी झाले आहेत. राज्यात मृतांचा आकडा वाढून २,३१४ झाला आहे. आयसीयूमध्ये ६०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या २४ तासांत २२,१६४ जलद प्रतिजैविक चाचण्यांसह एकूण ३६,९३६ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण १३,५०,७९२ लोकांची तपासणी केली गेली आहे. यापैकी १,४७,२५५ लोकांची जलद प्रतिजैविक तपासणी झाली आहे.

शक्रवारी राज्यात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी २,२२० रुग्ण एकट्या बेंगळूर शहरात सापडले आहेत. बेंगळूर शहरात संक्रमित लोकांची एकूण संख्या ५५,५४४ वर पोहोचली आहे. यापैकी, ३७,६१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १६,८९६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी शुक्रवारी १,११३ रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १,०२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी शुक्रवारी २० जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

बेंगळूर : नामांतरित क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Archana Banage

कर्नाटक : केंद्राची परवानगी मिळाल्यास मी प्रथम लस घेण्यास तयार

Archana Banage

वीरभद्रनगर येथे अडीच लाखाची घरफोडी

Patil_p

रेल्वेत अधिक साहित्य न्याल तर बसेल दंड!

Amit Kulkarni

समाजात सकारात्मकता रुजविणे ही प्रत्येकाची जबाबदारी

Patil_p

रमेश जारकिहोळी सीडी प्रकरणात पोलिसांनी नोंदविला एफआयआर

Archana Banage