Tarun Bharat

कर्नाटकमध्ये सोमवारी नवीन पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट, तर २४ मृत्यू

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात नवीन रुग्णसंख्येत घट झाली आहे. रविवारी गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात कोरोनाचे १,५९८ नवीन रुग्ण सापडले होते. तर सोमवारी या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळाली. राज्यात मागील २४ तासात १,१८६ नवीन रुग्णांची भर पडली. याच वेळी १,७७६ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर २४ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण बाधितांची संख्या २९,१९,७११ पोहोचली असून यापैकी २८,५९,५५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे ३६,८१७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्यात सक्रिय प्रकरणांची संख्या २३,३१६ होती. तर सोमवारी कोरोना चाचणी सकारात्मकता दर (टीपीआर) ०.८९ टक्के होता, तर केस मृत्यू दर (सीएफआर) २.०२ टक्के होता.

सोमवारी नोंदवलेल्या १,१८६ नवीन रुग्णांपैकी २९६ रुग्ण बेंगळूर शहरी जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यात ४१० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर १ रुग्णाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला.

Related Stories

कर्नाटक : शाळकरी मुलांना दुपारच्या जेवणात अंड्याला पर्याय चिक्की

Abhijeet Khandekar

चामराजनगर घटनेच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक

Archana Banage

पंतप्रधान कर्नाटकात ‘या’ दोन शहरांमध्ये लसीकरण मोहीम राबविणार

Archana Banage

केएएस अधिकाऱ्याच्या मालमत्तांवर एसीबीची छापेमारी सुरूच

Archana Banage

केंद्राकडे 10 हजार कोटींच्या विशेष पॅकेजची मागणी

Patil_p

कर्नाटक: तीन लाखाहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

Archana Banage