ऑनलाईन टीम / मुंबई :
‘कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प’ या शासकीय पुस्तकाचे आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाची अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार होते.


यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. कर्नाटक सरकार उर्मटपणे वागत आहे.’ ‘हे प्रकरण कोर्टात असताना ज्या पद्धतीने आधी बेळगावला उपराजधानी बनवली, मग नामांतर केले हा कोर्टाचा अपमान नाही का?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. ते पुढे म्हणाले की, एकतर हे सरकार तुमच्या पाठीशी आहे. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांच्यासोबत बैठक आहे. कर्नाटक सरकार कायद्याचा विचार करत नाही. मुख्यमंत्री कोणीही असो मराठींवर अन्याय करतात. हा भाग महाराष्ट्रात आणायचा आहे.
वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,एक दिलाने लढलो तर प्रश्न सुटेल. पवारसाहेबांनी यावर काम केले आहे. हा प्रश्न कोर्टात असेपर्यंत हा भाग केंद्रशासित का करत नाही? कोर्टात बेलगाम वागत आहे. हा भाग केंद्रशासित झाला पाहिजे, यात कर्नाटक सरकारची मस्ती चालू देणार नाही, असे आपण कोर्टात सांगितले पाहिजे.
प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव आल्याशिवाय कोणतेही भाष्य नाही- नाना पटोले