Tarun Bharat

कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये वाढतोय कोरोनाचा धोका

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यातील जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. बेंगळूररमध्ये कोरोनाचे प्रमाण सर्वाधिक होते. आता बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना प्रकरणात घट होत असून इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. खास करून ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील कोविड रूग्णांसाठी पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने परीस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी बेंगळूरला हलवावे लागेल, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

कोविडची प्रकरणे बेंगळूरमध्ये जास्त असली तरी सध्या येथील प्रमाण कमी होत आहे. परंतु इतर जिल्ह्यांमध्ये कोविड प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार १ एप्रिलपर्यंत बेंगळूरचा एकूण कोविड प्रकरणातील वाटा ६८ टक्के होता आणि १५ एप्रिलपर्यंत तो ७१ टक्क्यांपर्यंत पोहोचला. तथापि, १ मे पर्यंत शहराचा हिस्सा ४७ टक्क्यांपर्यंत खाली आला आणि २० मेपर्यंत तो केवळ ३२ टक्के होता. या आकडेवारीवरून असे दिसून येते की बेंगळूरमध्ये हळू हळू कोरोना संख्येत घट होत असताना उर्वरित कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये कोविडच्या घटनांमध्ये वाढ दिसून येत आहे.

बेंगळूरमध्ये देशात सर्वाधिक सक्रिय प्रकरणे आढळून आली आहेत आणि याचा परिणाम म्हणून आज एकाही आयसीयू बेड सापडत नाही. देशातील सर्वोत्तम पायाभूत सुविधांपैकी एक असलेले बेंगळूर शार कोविड संकट हाताळण्यास असमर्थ आहे.

आता आपण कल्पना केली की ग्रामीण भागातील कर्नाटक जिथे पायाभूत सुविधा नाहीत, ते त्या संकटांचे व्यवस्थापन कसे करतील. रूग्णांना बेंगळूर येथे नेण्यासाठी भाग पाडले जाऊ शकते. शहर रूग्णालयातील अंतर आणि प्रतीक्षा कालावधीमुळे अधिकच जीवितहानी होईल. ग्रामीण भागातील कोरोनाची वाढ चिंताजनक आहे.

Related Stories

कर्नाटक : २३ ऑगस्टला ५० टक्के क्षमतेने PU वर्ग सुरू होणार

Archana Banage

कर्नाटकात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट कायम

Archana Banage

कर्नाटक: बंडखोर मंत्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार

Archana Banage

बेंगळूर शहरात 84 टक्के लसीकरण

Amit Kulkarni

कोरोनाच्या दुसर्‍या लाटे दरम्यान ५२ मुले अनाथ

Archana Banage

बिहार निवडणुकीचा निकाल लागताच मुख्यमंत्री बदलेल

Archana Banage