Tarun Bharat

कर्नाटकातील दहा जिल्ह्यांमध्ये कायम स्वरूपी आपत्ती केंद्रे स्थापन केली जाणार

बेंगळूर/प्रतिनिधी


महसूलमंत्र्यांनी राज्यातील पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी नाही, असा होणार आरोप फेटाळला आहे. महसूलमंत्र्यांनी, जिल्हा उपायुक्तांच्या वैयक्तिक खात्यात ११२० कोटी रुपये जमा झाले आहेत तर खबरदारीच्या उपाययोजनांसाठी ३१० कोटी रुपये केंद्रानेही दिले आहेत. सरकारकडे निधीची कमतरता नाही. असे म्हंटले आहे.

सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री अशोक यांनी मुख्यमंत्र्यांनी मला माहिती दिली आहे की त्यांनी पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी सोडण्यास वित्त विभागाला सांगितले आहे’. ते म्हणाले की, राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये कायम स्वरूपी आपत्ती केंद्रे स्थापन केली जातील जिथे पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे विस्थापित लोकांना राहण्याची सर्व सोय उपलब्ध असेल. यासाठी 200 कोटी रुपये जाहीर केले जात आहेत.

Related Stories

मळणीच्या ताडपत्र्या विक्रीसाठी दाखल

Patil_p

खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस

Patil_p

कर्ज घेण्यास विरोध : काँग्रेसचा सभात्याग

Patil_p

ग्राहक सेवेत बेळगाव विमानतळ देशात 21 व्या स्थानी

Patil_p

ईडीची भीती दाखवून भाजपने सत्ता काबीज केल्याचा आरोप

Tousif Mujawar

चंद्रकांतदादा, शंभूराज देसाई 3 डिसेंबरला बेळगावात

datta jadhav