Tarun Bharat

कर्नाटकातील फास्टर बोटी राज्याच्या हद्दीत

स्पीडबोट नसल्याचे कारण पुढे करत अधिकाऱ्यांनी हात झटकले, मासेमार आंदोलनाच्या पवित्र्यात

दापोली/प्रतिनिधी

महाराष्ट्रामध्ये वादळी वारा व पाऊस पावसाच्या पार्श्वभूमीवर मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. यामुळे कोकणातील सर्व नौका सध्या सुरक्षित बंदरांमध्ये व खाड्यांमध्ये विसावल्या आहेत. याचा गैरफायदा घेत कर्नाटक राज्यातील फास्टर नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत व हर्णे समुद्रात धुमाकूळ घालत आहेत. त्यांना तात्काळ अटकाव करण्यात आला नाही तर येथील कोळी बांधव पेटून उठेल व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दापोली पंचायत समितीचे माजी सभापती रउफ हजवानी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिला आहे.

ते म्हणाले की त्यांना रोखणे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे हे शासनाचे काम आहे. आम्ही शासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनात ही गोष्ट आणून दिलेली आहे. तरीदेखील आपल्याकडे स्पीड बोटी नसल्याचे कारण पुढे करत शासकीय अधिकाऱ्यांनी हात झटकले आहेत. याचा आपण तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत.

शासनाने परराज्यातील या बोटींना तात्काळ अटकाव केला नाही व त्यांच्यावर कडक कारवाई केली नाही तर कोकणातील मासेमारी हा पेटून उठेल व भर समुद्रात संघर्षाचे वातावरण निर्माण होईल असा इशारा देखील हजवानी यांनी तरुण भारतशी बोलताना दिला आहे. आता बेकायदेशीरपणे अरबी समुद्रात मासेमारी करणाऱ्या या बोटींवर शासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान; कोल्हापुरात एकमेव ग्रामपंचायतीत मतदान

Archana Banage

भाजप आमदाराचे मुख्यमंत्री बदलाबाबत वक्तव्य

Archana Banage

NIA कडून पुन्हा PFI च्या २५ ठिकाणी छापेमारी, आठवड्याभरातील दुसरी मोठी कारवाई

Archana Banage

एकनाथ खडसेंना मोठा धक्का; ईडीकडून जावई गिरीश चौधरी यांना अटक

Archana Banage

बायडेन यांनी केली मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांची निवड

datta jadhav

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याच्या विधानामागे एक वेगळी रणनीती : शिवकुमार

Archana Banage
error: Content is protected !!