बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील हायस्कूल आणि प्री-युनिव्हर्सिटी महाविद्यालये सुमारे १८ महिन्यांनंतर सोमवारी पुन्हा सुरू झाली आणि काही खासगी शाळा बंद असतानाही विद्यार्थी सरकारी संस्थांमध्ये परतले. राज्य सरकारने सांगितले की सरकारी शाळांमधील बहुसंख्य शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान सम्पूर्ण कर्नाटकात सोमवारी शाळा सुरु झाल्या पण पाच जिल्ह्यात शाळा उघडल्या नाहीत.
कर्नाटकात बहुतांश १८ महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवारी शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू झाल्याने गोंधळ उडाला. परंतु पाच जिल्हे अपवाद ठरले. उडुपी, दक्षिण कन्नड, कोडगू, चिक्कमंगळूर आणि हसन जिल्ह्यात शाळा बंद राहिल्या जिथे कोविड पॉझिटिव्हिटी रेट २ टक्क्यांच्या वर आहे.
दरम्यान, शाळेलच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई शिक्षण मंत्री बी. सी. नागेश, उच्च शिखणमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांच्यासह अधिकाऱ्यांनी बेंगळूर येथील शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


दरम्यान, चिक्कमंगळूर आणि हसनमध्ये सकारात्मक प्रकरणांमध्ये घट झाल्याचा अर्थ असा आहे की या जिल्ह्यांच्या शैक्षणिक संस्था या महिन्याच्या अखेरीस शाळा, महाविद्यालये उघडली जाऊ शकतात. कर्नाटकात सरासरी चाचणी सकारात्मकता दर (टीपीआर) ०.८५ टक्के आहे.
कोडगू जिल्ह्यात कोरोना सकारात्मक दर दोन टक्क्यांच्या वर आहे. दरम्यान, कोडगू जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. मोहन यांनी जोपर्यंत सकारात्मकतेचा दर जास्त आहे तोपर्यंत सरकार जिल्ह्यातील शाळा पुन्हा उघडणार नाही. “आम्ही मुलांचा जीव धोक्यात घालू शकत नाही,” असे ते म्हणाले.