Tarun Bharat

कर्नाटकातील विविध जिल्ह्यांसाठी आयएमडीकडून रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

हवामान बदलामुळे कर्नाटकातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर आता दक्षिण कर्नाटकातील किनारपट्टी व अंतर्गत भागात हवामान विभागाने रेड अलर्ट जरी केला आहे.

आयएमडी बेंगळूर सेंटरचे प्रमुख सी. एस. पाटील म्हणाले की झारखंड आणि त्याच्या आसपासच्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, तर पूर्व मध्य अरब समुद्रापासून दक्षिण कोकणात वारे वाहात आहे. कर्नाटक किनाऱ्याजवळ आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याच्या प्रभावामुळे किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे.

आयएमडीने १५ जूनला उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, १६ आणि १७ जूनला ऑरेंज अलर्ट इशारा आणि १८ जूनला यलो अलर्ट दिला आहे. तर १७ जूनला शिवमोगा, कोडगू, गदग आणि हवेरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी उत्तर कर्नाटकात तुरळक पाऊस पडला. दरम्यान बेंगळूर शहरात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Related Stories

कर्नाटक : राज्यात शनिवारी ५३१ नवीन बाधित रुग्णांची भर

Abhijeet Shinde

हुबळी येथील चंद्रशेखर गुरुजी हत्या प्रकरणी दोघांना अटक

Rohan_P

सेक्स सीडी प्रकरण: एसआयटीने महिलेला बजावली पाचवी नोटीस

Abhijeet Shinde

राज्यात शनिवारी ६,९५५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Abhijeet Shinde

मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱया एच. विश्वनाथ यांना दणका

Patil_p

आयएमए घोटाळा प्रकरणात रोशन बेग यांना जामीन मंजूर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!