Tarun Bharat

कर्नाटकातील ११ जिल्ह्यात २१ जूनपर्यंत लॉकडाऊन

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना सकारात्मकतेचे प्रमाण जास्त असलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये २१ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. दरम्यान कर्नाटकमधील ३० जिल्ह्यांपैकी ११ जिल्हे २१ जूनपर्यंत लॉक असतील, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी दिली.

“कोरोना प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तांत्रिक सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार, चिकमंगळूर, शिवमोगा, दावणगिरी, म्हैसूर, चामराजनगर, हसन, दक्षिण कन्नड, बेंगळूर ग्रामीण, मंड्या, बेळगाव आणि कोडगू जिल्ह्यात कोरोना सकारात्मकतेचा दर जास्त असल्याने या जिल्ह्यात लॉकडाऊन कायम असेल. तसेच या जिल्ह्यांमध्ये कोणत्याही निर्बंधामध्ये बदल होणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले.

तर इतर सर्व जिल्ह्यात १४ जून ते २१ जून या कालावधीत निर्बंधात बदल केले जातील. सर्व कारखाने ५० टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत काम करू शकतात. गारमेंट उद्योगांमध्ये केवळ ३० टक्के कर्मचारी काम करू शकतात. आवश्यक वस्तू पुरवठा करणारी सर्व दुकाने व स्टोअर सकाळी ६ ते सकाळी १० च्या ऐवजी दुपारी २ वाजेपर्यंत खुली राहू शकतात, ” असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related Stories

रेमडेसिवीर विदेशातूनही आयात करणार

Amit Kulkarni

मालवण शहरामध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी

Ganeshprasad Gogate

सर्व सामन्यांसाठी लोकल नव्या वर्षात सुरू होणार : इकबाल चहल

Rohan_P

पाकिस्तानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2,57,914 वर

Rohan_P

कराचीत बॉम्बस्फोट; 3 ठार, 13 जखमी

datta jadhav

न्यूयॉर्कमध्ये भारतीय पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

prashant_c
error: Content is protected !!