Tarun Bharat

कर्नाटकातील ६३० ग्रामपंचायतींमध्ये सुरु होणार नवीन आधार केंद्रे

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक सरकारने राज्यभरातील खेड्यांमध्ये नवीन आधार केंद्रे सुरू करण्याची योजना आहे. नागरिकांनी त्यांचे आधार तपशील अद्ययावत करण्यासाठी व पाच वर्षाखालील मुलांना नोंदणी करण्यासाठी राज्य सरकार ग्रामीण भागात आधार केंद्रे सुरू करणार आहे.

दरम्यान, ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता राज्य सरकारने राज्यभरातील खेड्यांमध्ये नवीन आधार केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार पहिल्या टप्प्यात सरकार ६३० ग्रामपंचायतींमध्ये नवीन आधार केंद्रे स्थापन करणार आहेत, जेथे पंचायत अधिकाऱ्यांना आधार नोंदणीसाठी किंवा आधार तपशील बदलण्यासाठी आणि अन्य सेवांसाठी मोबाइल फोन देण्यात येतील.

ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव लालकृष्ण अतीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने खेड्यांमध्ये आधार केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. हि आधार केंद्रे ग्रामपंचायतींमध्ये सुरु केली जाणार असून या केंद्रांतील सेवेसाठी नागरिकांकडून ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे, असे ते म्हणाले. तसेच आधारसाठी मुलांची नावनोंदणी विनामूल्य असेल.

Related Stories

कोरोना : WHO ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

datta jadhav

जॅकलीनची परदेशात जाण्यासाठी कोर्टात धाव

Abhijeet Khandekar

मोठी बातमी ! कर्नाटकात उद्यापासून नाईट कर्फ्यू

Abhijeet Shinde

BREAKING: गोकुळ दूधाच्या विक्री दरात ४ रुपयांची वाढ

Abhijeet Shinde

‘पोषण अभियान जन आंदोलन’ मध्ये सातारा जिल्हा महाराष्ट्रात प्रथम !

Abhijeet Shinde

अभिनेत्री पायल घोषचा रामदास आठवलेंच्या पक्षात प्रवेश

Rohan_P
error: Content is protected !!