Tarun Bharat

कर्नाटकातून विक्रीसाठी आणलेल्या सव्वापाच लाखाचा रेशनचा तांदूळ जप्त, चालकास अटक

प्रतिनिधी/कोल्हापूर

कर्नाटक राज्यातून बेकायदेशीररित्या रेशनचे तांदूळ घेवून कोल्हापुरात आलेल्या ट्रकवर जिल्हा पुरवठा कार्यालयाने कारवाई केली. यावेळी ट्रकमध्ये असलेली २५ किलो वजनाची ५ लाख १६ हजार रुपये किंमतीची ८६० तांदळाची पोती व ५ लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून ट्रक चालक आसिफ बाबासाहेब मुल्ला ( वय-३५, संकेश्वर पोलीस ठाण्याजवळ, ता. चिक्कोडी, जिल्हा – बेळगांव) याला अटक करण्यात आली आहे.

देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यक्ती व वाहनांना देशभरात फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. असे असताना कर्नाटक राज्यातील हुक्केरी येथून (केए-२३-ए-८९९८) या क्रमांकाचा एक ट्रक कोल्हापूर शहरामध्ये बेकायदेशीररित्या रेशनचे तांदूळ विक्रीसाठी येत असल्याची माहिती कोल्हापूरातील अन्नधान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये बोलावून घेतले. या ट्रकचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कर्मचारी पाळतीवर होते.

आज, बुधवारी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे माधवी शिंदे या काशीनाथ पालकर, सतिश शिंदे, संजय गिते, बबन घोडके असे पंचांसह मार्केट यार्ड येथे पोहोचले. मार्केट यार्डातील पोस्ट ऑफिस मागील मोकळ्या जागेमध्ये संबंधित ट्रक आढळून आला. ट्रकच्या चालकाकडे विचारणा केली असता ट्रक चालक आसिफ मुल्ला याने श्री रवी गजबर यांच्या रवी ट्रेडर्स कंपनी बाजार रोड हुक्केरी यांच्या मालकीचा हा ट्रक असून हुकेरी येथून ८६० पोती तांदूळ भरुन तो कोल्हापुरातील शाहूपूरी पाचव्या गल्लीतील निधी ट्रेडिंग कंपनी यांना विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.

त्याच्याकडे याबाबतच्या परवान्यांची मागणी केली असता या संबंधित कोणतीच कागदपत्रे आढळली नसल्याने शहर अन्नधान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे यांनी संबंधितांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पुरवठा निरीक्षक सुरेश टिपुगडे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालक मुल्ला याला अटक करण्यात आली.

Related Stories

चंदगडच्या कोवाडमध्ये पावसाचा जोर वाढला, पुराच्या भीतीने व्यापारी धास्तावला

Kalyani Amanagi

कोल्हापूर : जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल

Archana Banage

कोल्हापुरात फुटबॉल खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी सुरू

Abhijeet Khandekar

उगाच तोंड उघडायला लावू नका, हवेतून खाली या…; मिटकरींचा केसरकरांना इशारा

Archana Banage

लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय लवकरच : उद्धव ठाकरे

Tousif Mujawar

राज्यातील कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी

Archana Banage