Tarun Bharat

कर्नाटकात आतापर्यंत २,८५६ जणांना ‘ब्लॅक फंगस’चा संसर्ग

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे २,८५६ रुग्ण आढळले असून त्यापैकी २२५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आरोग्य विभागाने सामायिक केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यभरातील विविध रुग्णालयात २,३१६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १९१ बरे झाले आहेत, तर २२५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच १२४ जणांना वैद्यकीय सल्ल्याविरूद्ध सोडले, असे आरोग्य विभागाने म्हंटले आहे.

दरम्यान बेंगळूर येथे ब्लॅक फंगसचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. ९५९ रुग्ण हे बेंगळूरमध्ये आहेत. त्यापैकी ८२५ रुग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, ४९ जण बरे झाले आहेत तर ७२ जण मृत्यूमुखी पडले आहेत. धारवाडमध्ये २२९, गुलबर्गामध्ये १६८, बेळगावमध्ये १५९, विजयपुरामध्ये १३०, चित्रदुर्गात १२६, बळ्ळारीमध्ये ११०, बागलकोटमध्ये १०९ आणि म्हैसूर आणि रायचूरमध्ये प्रत्येकी ९८ रुग्ण आहेत. .
कर्नाटकात कोरोनानंतर दुसरे मोठे संकट म्हणजे म्युकरमायकोसिस हे आहे. राज्यात कोरोना संसर्गाच्या वाढीबरोबरच, ब्लॅक फंगसचे प्रमाण देखील चिंताजनक आहे.दरम्यान राज्यात बहुतांशी कोरोना रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसचा संसर्ग आढळून आला आहे.

Related Stories

बेंगळूर हिंसाचार प्रकरणी माजी महापौरांना दुसऱ्यांदा नोटीस

Abhijeet Shinde

एसएसएलसी परीक्षेसाठी ३० बहुपर्यायी प्रश्न असणार

Abhijeet Shinde

कर्नाटक : राज्यात विवाहसोहळा, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नवी नियमावली

Abhijeet Shinde

कर्नाटक: राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८७ टक्क्यांहून अधिक

Abhijeet Shinde

बेळगावमध्ये आयटी पार्कसाठी संरक्षण खात्याची जमीन द्या

Patil_p

माझ्या राजीनाम्याने म्हैसूर कोरोनामुक्त होणार असेल तर राजीनामा देण्यास तयार: मंत्री सोमशेखर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!