Tarun Bharat

कर्नाटकात उद्यापासून १४ दिवसाचा कडक लॉकडाऊन

बेंगळूर/ ऑनलाईन टीम

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यात उद्यापासून १४ दिवसाच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. बेंगळूर येथे आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्याता आला आहे. राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या रात्रीपासून निर्बंध लागू होणार आहेत. यावेळी सरकारकडून जनतेला या काळात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच कर्नाटकमध्ये १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस दिली जाईल असं कर्नाटकेचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलं आहे.

या लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. दुकानं सकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत अर्थात ४ तास सुरु असतील. त्यानंतर दुकानं बंद असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. त्या व्यतिरिक्त इतर सेवा पूर्णपणे बंद असतील असं सांगण्यात आलं आहे. तर बांधकाम, शेती आणि उत्पादन क्षेत्राला परवानगी असणार आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असणार आहे. त्याचबरोबर राज्य आणि राज्याबाहेर यात्रा करण्याची परवानगी नसेल. अत्यावश्यक प्रकरणात सूट दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचबरोबर दारुच्या होम डिलिव्हरीलाही मंजुरी देण्यात आली आहे.

कर्नाटक देशातील तिसरं कोरोना प्रभावित राज्य आहे. कर्नाटकमध्ये आतापर्यंत १४ हजारांहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये एका दिवसात २९,४३८ रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासन खडबडून जागं झालं आहे. तर एका दिवसात २०८ जणांनी कोरोनामुळे जीव गमवला आहे.

Related Stories

पाचव्या चारा घोटाळय़ात लालू यादव दोषी

Patil_p

भारतात 91 लाख रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav

राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी पून्हा लांबणीवर

Archana Banage

पुणे : कोरोनामुळे यंदा गणेश विसर्जन मिरवणूक नाही

Tousif Mujawar

आज पंतप्रधान मोदींचा योगदिन संदेश

Patil_p

राज्यात कोरोनाच्या 3,222 नव्या रुग्णांची नोंद

Amit Kulkarni