Tarun Bharat

कर्नाटकात ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण

चंदिगढ-आंध्रप्रदेशमध्येही ओमिक्रॉनचा शिरकाव : देशातील एकूण रुग्णसंख्या 37 वर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कर्नाटकमध्ये रविवारी दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या 34 वषीय व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राज्यातील हा ओमिक्रॉनचा तिसरा तर देशातील 37 वा रुग्ण आहे. या रुग्णावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू आहे, असे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले. महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीनंतर आता आंध्रप्रदेशमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेला रुग्ण सापडला आहे. आयर्लंडमधील 34 वषीय प्रवाशाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे चंदिगढमध्येही रुग्ण आढळला आहे. शनिवारी रात्री उशिरा एका तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. इटलीहून आलेल्या एका 20 वर्षीय तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. तसेच नागपूरमध्ये देखील ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून बुर्किंना फासो या पश्चिम आफ्रिकेतील देशातून आलेल्या प्रवाशाला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या नवीन रुग्णसंख्येसह देशातील एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या 37 वर पोहोचली आहे.

Related Stories

देशात नव्या रुग्णांमध्ये घट झाल्याने दिलासा

Patil_p

क्या बोलना है, आजका थीम क्या है !

Patil_p

“गाईचं शेण, गोमुत्रामुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि …” : मुख्यमंत्री शिवराज सिंहांचे वक्तव्य

Archana Banage

‘तोयबा’ दहशतवाद्यासह हाफिज हमजाचा खात्मा

Patil_p

जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा 3 ऑक्टोबरला

Patil_p

रामनाथ कोविंद होणार सोनिया गांधींचे शेजारी

Patil_p
error: Content is protected !!