Tarun Bharat

कर्नाटकात कोरोनाचे १ हजार ३६५ नवीन रुग्ण

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात बुधवारी कोरोना संसर्गाची १,३६५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, बेंगळूर शहरी जिल्ह्यात सर्वात जास्त ३२७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दक्षिण कन्नड जिल्ह्यात २६८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

बुधवारी राज्यातील १,५५८ रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्याचबरोबर या काळात २२ लोकांचा मृत्यू झाला. बुधवारी, कोरोनाची सक्रिय प्रकरणे२१,२६६ वर पोहोचली. तर राज्याच्या इतर जिल्ह्यांत, म्हैसूरमध्ये १२३ नवीन बाधितांची नोंद झाली आहे.

Related Stories

कर्नाटकात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

Archana Banage

कोरोना प्रोटोकॉलचे पालन न केल्याने हॉटेल, सुपरमार्केट सील

Archana Banage

मुख्यमंत्री बोम्माई यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची घेतली भेट

Archana Banage

बसकल्याणमध्ये 59.57 टक्के, मस्कीत 70.48टक्के मतदान

Patil_p

कर्नाटकचे वनमंत्री आनंद सिंग यांना कोरोनाचा संसर्ग

Tousif Mujawar

आजपासून खासगी बसेस सोडणार

Patil_p
error: Content is protected !!