Tarun Bharat

कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृतांच्या संख्येत वाढ

बेंगळूर/प्रतिनिधी

कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यापासून विशेषतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कर्नाटकात एकूण मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू गेल्या अडीच महिन्यांत झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढली आहे. दुसर्‍या लाटेने वीस वयोगटातील मुले, किशोरवयीन मुले आणि तरूणांना सोडले नाही. ज्यामुळे अनेक जण कोरोना संक्रमित आणि मृत्युमुखी पडले आहेत.

आकडेवारीनुसार, १ मार्च ते १५ मे दरम्यान ७,०६,४९९ लोकांना कोरोना संसर्ग झाला, त्यापैकी ७,९८० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तथापि, गेल्या वर्षी कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून २१,७१,९३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २१,४३४ लोकांनी आपला जीव गमावला आहे.

या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की दुसर्‍या लाटेत नऊ वर्षांपर्यंतच्या २०,२०६ मुलांना संसर्ग झाला होता, त्यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला, तर ५१६७३ किशोरवयीन मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १९ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर विस वर्षातील १,५३,१७४ तरुण कोरोना संक्रमित झाले असून १५१ जणांनी आपला जीव गमावला आहे.

आकडेवारीनुसार, चाळीशीतले तब्बल ४६७ लोक, चाळीस वर्षातील १,०३७ आणि पन्नाशीतील १,७१७ लोक कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मरण पावले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सर्वाधिक फटका बसला. ९३,४८३ संक्रमितंपैकी २१९८ जणांनी आपला जीव गमावला आहे.

तर सत्तर वयाच्या २८, ६५८ संक्रमित व्यक्तींपैकी १५८४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच इतर वयोगटाच्या तुलनेत ८० आणि ९० वयाच्या लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण खूपच जास्त होते.

Related Stories

कर्नाटकात शनिवारी ६ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Archana Banage

कर्नाटक पोटनिवडणूक: सीरा येथे ८२ टक्के तर आर.आर.नगरसाठी ४५ टक्के मतदान

Archana Banage

कर्नाटक ग्रामपंचायत निवडणूक : मतदानासाठी कोरोना रुग्णांना विशेष व्यवस्था

Archana Banage

कर्नाटक: कोरोना रुग्णसंख्येत घट

Archana Banage

कर्नाटक : राज्यात शुक्रवारी ९७० पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Archana Banage

देशात कोरोनाची सर्वाधिक सक्रिय प्रकरणे बेंगळूर जिल्ह्यात

Archana Banage