Tarun Bharat

कर्नाटकात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात पूर्ण लॉकडाऊननंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वेग मंदावला आहे. राज्यात सोमवारी ११,९५८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे २ हजार पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकात सोमवारी ११,९५८ नवीन कोरोना रुग्णांची तर ३४० मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच २७,२९९ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. दरम्यान राज्यात आतापर्यंत २७.०७ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३१,९२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. लॉकडाऊनपासून जिल्ह्यात कोरोनाचा वेग कमी कमी होत आहे. सोमवारी जिल्ह्यात १,९९२ नवीन संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तर ११,४८८ रुग्ण रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच जिल्ह्यात १९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या २७,०७,४८१ वर पोहोचली आहे. यापैकी २४,३६,७१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३१,९२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची एकूण संख्या २,३८,८२४ इतकी आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह दर ९.०८ टक्के होता, तर सीएफआर दर २.८४ टक्के होता.

Related Stories

कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करा अन्यथा कारवाई

Archana Banage

चालकाच्या सतर्कतेमुळे वाचला ५० विध्यार्थांचा जीव

Rohit Salunke

शुक्रवारी 2,290 बाधितांची नोंद

Amit Kulkarni

राज्यातील बांगलादेशी, पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करणार

Amit Kulkarni

कर्नाटकातील विद्यार्थ्यांसाठी एनएलएसआययू २५ टक्के जागा राखीव ठेवणार

Archana Banage

पहिली ते नववीच्या परीक्षासंदर्भात दोन दिवसात निर्णय : शिक्षणमंत्री

Amit Kulkarni