Tarun Bharat

कर्नाटकात गुरुवारी १० हजाराहून अधिक कोरोना संक्रमित

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात गुरुवारी पुन्हा कोरोना बाधित रुग्णांची वाढ झालेली पाहायला मिळाली. गुरुवारी राज्यात कोरोनाची १०,०७० नवीन प्रकरणे नोंदली गेली. तर याचवेळी राज्यात ७,१४४ रूग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच आरोग्य विभागाने राज्यात आणखी १३० जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती दिली.

राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ६ लाखाच्यावर गेली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ६,११,८३७ इतके असून त्यापैकी ४,९२,४१२ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर विजय मिळविला आहे. तर सद्य स्थितीला राज्यात १,१०,४१२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनाने आतापर्यंत ८,९९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आयसीयू मधील रुग्णांची संख्या ८११ इतकी आहे. गुरुवारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०. ४८ टक्के होते आणि मृत्यूचे प्रमाण १.४६ टक्के होते. तर राज्यात ९६,५९८ लोकांची कोरोना तपासणी केली आहे.

Related Stories

सीडी प्रकरणातील ‘त्या’ युवतीचे न्यायाधीशांना पत्र

Amit Kulkarni

राज्य भाजप प्रभारीपदी अरुणसिंग यांची वर्णी

Patil_p

मुख्यमंत्र्यांचे भाजपमधील मतभेदांबद्दल मौन

Archana Banage

देवेगौडांनी घेतली नितीन गडकरींची भेट

Amit Kulkarni

विजापूर शहरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला

Archana Banage

कर्नाटकात बाधितांच्या संख्येत वाढ

Archana Banage