Tarun Bharat

कर्नाटकात गुरुवारी ८ हजाराहून अधिक रुग्णांची भर

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकमधील कोरोनाचा वेग थांबता थांबत नाही. गुरुवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण ८,४७७ नवीन कोरोना प्रकरणांची नोंद झाली आहे. नेहमीप्रमाणे बेंगळूरमध्ये सर्वाधिक रुग्णांची भर पडली आहे. गुरुवारी बेंगळूरमध्ये ३,७८८ रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्याचवेळी घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या ८,८४१ इतकी होती. राज्यात गुरुवारी एकूण ८५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४५ जण बेंगळूर मधील आहेत. राज्यात कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत १०,२८३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात गुरुवारी कोरोनाची एकूण सक्रिय रुग्णसंख्या ११३५३८ होती. तर सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या राजधानी बेंगळूरमध्ये असून ती ६५२६८ इतकी आहे.

बेंगळूर शहरी जिल्ह्यात गुरुवारी ३७८८ रुग्णांची भर पडली तर ३,५२० रुग्ण घरी परतलेत. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील ३,४६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

कर्नाटक: राज्यात लवकरच ‘राईस एटीएम’ सुविधा

Abhijeet Shinde

कर्नाटकात शुक्रवारी ३,३१० नवीन संक्रमितांची नोंद

Abhijeet Shinde

कर्नाटक: राज्य सरकार नवीन लोकसंख्या धोरण आणण्याच्या तयारीत

Abhijeet Shinde

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील दोघांना संधी?

Amit Kulkarni

एमबीबीएस परीक्षा नियोजित वेळेत, बीडीएस विद्यार्थ्यांना दिलासा

Abhijeet Shinde

उद्यापासून पुन्हा मुसळधार

Amit Kulkarni
error: Content is protected !!