Tarun Bharat

कर्नाटकात गेल्या २४ तासात १ हजार ४५३ नवीन बाधितांची नोंद

बेंगळूर/ प्रतिनिधी

कर्नाटकात शुक्रवारी १,४५३ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तर १,४०८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. दरम्यान, राज्यातील आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या २८, ७७, ७८५ झाली आहे. तर राज्यात एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या २१,१६१ आहे. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट ०.८३ टक्के होता, तर केस फॅटॅलिटी रेट (सीएफआर) १.१६ टक्के होता.

दरम्यान, शुक्रवारी नोंदवलेल्या १,४५३ नवीन रुग्णांपैकी ३५२रन बेंगळूर शहरी जिल्ह्यातील आहेत. तसेच जिल्ह्यात शुक्रवारी ३८१ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राज्यात १७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यापैकी दक्षिण कन्नडमध्ये सर्वाधिक मृत्यू ६ झाले, म्हैसूर आणि उत्तर कन्नडमध्ये प्रत्येकी २ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. यामध्ये बेंगळूर शहरी जिल्ह्यात ३५२, दक्षिण कन्नड ३४१, उडुपी१७६, हसन १०१, कोडगु ९५ रुग्ण सापडले आहे.

राज्यात आतापर्यंत बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहे. दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२,३४,५०९ जणांना कोरोनाची लग्न झाली आहे. यासह बेंगळूर शहरी जिल्हा संक्रमित प्रकरणांच्या यादीत अव्वल आहे. तर म्हैसूरमध्ये १,७५,०८० आणि तुमकुरमध्ये १,१८,८१९ रुग्ण सापडले आहेत. तर बेंगळूर शहरी जिल्ह्यात आतापर्यंत १२,१०,६४० रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. म्हैसूरमध्ये १,७१,७२५ ​​आणि तुमकूरमध्ये १,१७,०५८ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण ४,१६,८२,३५७ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे, त्यापैकी १,७३,००० नमुन्यांची चाचणी शुक्रवारी घेण्यात आली आहे.

Related Stories

कर्नाटक: सरकार कोरोना मृतांची संख्या लपवत आहे : पाटील

Archana Banage

कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी ओवेसींनी जाहीर केली 3 उमेदवारांची पहिली यादी

Abhijeet Khandekar

राज्यातील पुढील सर्व निवडणूका सहा महिने लांबणीवर

Tousif Mujawar

कर्नाटक: गेल्या सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त : गृहमंत्री

Archana Banage

नव्या विषाणूचा अभ्यास करण्यासाठी राज्यात ६ प्रयोगशाळा स्थापन करणार : आरोग्यमंत्री

Archana Banage

कर्नाटक: सीरा, आर. आर. मतदारसंघातील पोटनिवडणूक ३ नोव्हेंबरला

Archana Banage