Tarun Bharat

कर्नाटकात गेल्या २४ तासात २ हजार १६१ नवीन संक्रमित रुग्णांची नोंद

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. पूर्ण लॉकडाऊननंतर राज्यात कोरोनाचा वेग मंदावला आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्ण संख्या ३८ हजाराहून कमी आहे. दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासात २,१६१ नवीन संक्रमित रुग्ण सापडले आहेत. तर शनिवारी २,८७९ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात शनिवारी ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. शनिवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १.४८ टक्के होते. तर मृत्यू दर २.२२ टक्के होता.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८,६९,३२० लाखावर पोहोचली आहे. तर यापैकी २७,९६,३७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३५,७७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३७,१४१ इतकी आहे. दरम्यान, शनिवारी १,४५,६६६ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना चाचणींची संख्या ३,५७,७५,७२० वर पोहोचली आहे.

Related Stories

कर्नाटक: दसऱ्यानंतर प्राथमिक शाळा होणार पुन्हा सुरू

Archana Banage

तिरुपती बालाजी दर्शन ऑनलाईन बुकिंग करताय ! जरा थांबा आधी ही बातमी वाचा

Abhijeet Khandekar

बेंगळूर: कोरोना रिक्त बेड वापरण्यास परवानगी द्या

Archana Banage

पाच वर्षांपेक्षा अधिक वर्षे ठाण मांडून असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करा!

Tousif Mujawar

बेंगळूर: आयआयएससीचे नवे संचालक म्हणून प्रा. गोविंद रंगराजन यांची नियुक्ती

Archana Banage

आपत्कालीन निधी 2,500 कोटी रुपयांवर वाढविण्याचा निर्णय

Amit Kulkarni