Tarun Bharat

कर्नाटकात गेल्या २४ तासात १ हजार ४६४ नवीन रुग्ण, तर २९ मृत्यू

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झालेली पहायला मिळाली. कोरोना रुग्णांची संख्या दररोज कमी जास्त होत आहे. राज्यात लॉकडाऊननंतर सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने राज्याने नियमांमध्ये शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २६ हजारांवर पोहोचली आहे. राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे १,४६४ नवीन संक्रमित रुग्ण सापडले. याचवेळी २,७०६ रुग्ण कोरोनावर विजय मिळवून रुग्णालयातून घरी परतले. तर सोमवारी राज्यात ४,९९२ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले होते. मंगळवारी राज्यात कोरोनमुक्त रुग्णांची संख्या कमी झाली. मंगळवारी २९ रुग्णांचा मृत्यू झाला. मंगळवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १.२९ टक्के होते. तर मृत्यू दर १.९८ टक्के होता.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८,८६,७०२ लाखावर पोहोचली आहे. तर यापैकी २८,२४,१९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३६,२२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २६,२५६ इतकी आहे.

राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे ३५२ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर याचवेळी १,११० रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात ५ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.

Related Stories

Paytm चे CEO विजय शेखर शर्मा यांची जामिनावर सुटका

Archana Banage

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

Tousif Mujawar

अर्थव्यवस्थेत ४ दशकातील सर्वात मोठी घसरण

Amit Kulkarni

मंत्रीमंडळ विस्तारावर अंजली दमानियांची टीका; म्हणाल्या, …एका माळेचे मणी

Archana Banage

Nasik; नाशिकच्या शास्रार्थ सभेत महंतांची हमरीतुमरी

Abhijeet Khandekar

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

Archana Banage
error: Content is protected !!