Tarun Bharat

कर्नाटकात जाण्यासाठी केरी तपासणी नाक्यावर गर्दी

अधिकाऱयांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणाखाली : तीन दिवसात 1200 कामगारांना कर्नाटकात पाठविले

प्रतिनिधी / वाळपई

कोरोना रोगामुळे गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात अडकून पडलेल्या कर्नाटक भागातील मजुरांना घरी पाठविण्यासंबधी कर्नाटक सरकारकडून मोठय़ा प्रमाणात गोंधळ निर्माण झाल्यामुळे गेल्या तीन दिवसापासून कर्नाटकी मजूर केरी भागामध्ये मोठय़ा प्रमाणात गोळा होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गोवा सरकारकडून चांगल्या प्रकारचे सहकार्य प्राप्त होत असल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून जवळपास 700 मजूराना कर्नाटक भागामध्ये पाठविण्यास गोव्याला यश आलेले आहे. आज सकाळपासून जवळपास 500 पेक्षा जास्त कामगार केरी याठिकाणी गोळा झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात गोंधळ निर्माण झाला.

 गोवा राज्याचे प्रधान सचिव उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर मेनका सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर तालुक्मयाचे मामलेदार अनिल राणे सरदेसाई पोलीस स्थानकाचे निरीक्षक शिवराम वायंगणकर डिचोली पोलीस उपाधीक्षक गुरुदास गावडे व इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन एकूण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

 शेवटी कर्नाटक सरकारशी संपर्क साधून या कामगारांनी नेण्यासाठी दहा बसेसची व्यवस्था करण्याचे विनंती करण्यात आली असून रात्री उशिरा त्यांना कर्नाटक भागांमध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याबाबतची माहिती अशी की जागतिक स्तरावर कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव यापार्श्वभूमीवर देशांमध्ये मोठय़ा प्रमाणात लाँकडाऊन करण्यात आला .यामुळे अनेक राज्यांमध्ये परप्रांतीय मजूर व नागरिक अडकून पडले होते. गोव्यामध्ये कर्नाटक भागातील मजुरांची संख्या प्रचंड प्रमाणात असून लाँकडाऊनमध्ये शिथिल करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने अडकलेल्या मजूर व नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून आदेश जारी केला होता. यामुळे सदर कामगाराना घरी पाठविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

दोन दिवसापासून कामगार घरी जात आहेत

  कर्नाटक भागातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात घरी जाण्यासाठी नाव नोंदणी केलेली आहे .दोन दिवसापासून केरी भागातून कामगारांना पाठविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक शिवराम वायगणकर उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर मामलेदार अनिल राणे यांच्या चांगल्या सहकार्यामुळे शनिवारी जवळपास 256 तर रविवारी जवळपास 450 कामगार कर्नाटक भागामध्ये गेलेले आहेत . आज सकाळी अचानकपणे केरी  भागामध्ये मोठय़ा प्रमाणात कामगारांची जमवाजमव झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शिवराम वायंगणकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन एकूण परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. सदर कामगार गोवा राज्याच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये मजूर व इतर स्वरूपाचे काम करीत होती .काही कामगारांनी स्वतः खाजगी वाहनांच्या माध्यमातून केरी याठिकाणी सीमेवर येऊन घरी जाण्याचा मानस व्यक्त केला. काही कामगार चालत येऊन केरी याठिकाणी एकसंघ झाले होते. सकाळपासून ही कामगार मंडळी घरी जाण्याची इच्छा व्यक्त करीत होती. याबाबतची माहिती मिळतात गोवा राज्याचे प्रधान सचिव उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर मेनका सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर मामलेदारांनी  अनिल राणे सरदेसाई पोलीस उपधिक्षक गुरुदास गावडे पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन एकूण परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा  प्रयत्न केला. दुपारपासून संध्याकाळपर्यंत या कामगारांची कागदपत्रे प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू होते.

कर्नाटका सरकारशी संपर्क.

 दरम्यान कर्नाटक भागातील संबंधित यंत्रणेशी संपर्क साधल्यानंतर संबंधित अधिकारी मंडळी केरी याठिकाणी येऊन कर्नाटक शासनाच्यावतीने त्यांचे नाव नोंदणी करण्यात आलेली आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत जवळपास साडेचारशे कामगारांची नोंदणी करण्यात आली होती .त्यानुसार बसेसची व्यवस्था करण्यात आली असून उशिरापर्यंत  कर्नाटक भागातील नागरिकांना घेऊन जाण्यासाठी  केरी येथे अधिकारी येणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. सुमारे दहा बसेसची व्यवस्था करण्यात आली असून त्यांना सुखरूपपणे संबंधित गावांमध्ये नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशा प्रकारची माहिती संबंधित खात्याच्या अधिकारी सूत्रांकडून उपलब्ध झालेली आहे . दरम्यान पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार शनिवारपासून कर्नाटक भागातील नागरिकांना घरी पाठविण्याच्या कामाला प्रारंभ झालेला आहे .शनिवारी जवळपास 267 तर  रविवारी जवळपास 450 कामगारांना घरी पाठविण्यात आलेले आहे. कामगारांमध्ये गैरसमज निर्माण होत असल्यामुळे व राज्याच्या वेगवेगळय़ा भागातून अनेक जण चालत येऊन केरी याठिकाणी जाण्यासाठी गर्दी करीत असतात अशा प्रकारची परिस्थिती आजही पहावयास मिळाली. त्यामुळे काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची गैरसोय त्यांना होऊ दिली गेली नसल्याचे श्री वायंगणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

मुरगावच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना अपात्र ठरवावे

Patil_p

आसगावात झाडांची कत्तल करण्यास ग्रामस्थांचा विरोध

Patil_p

गोवा मराठी अकादमी आयोजित कथा स्पर्धेचा निकाल जाहीर

Amit Kulkarni

ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र सप्ताहात विधानसभेचे अधिवेशन घेणे धक्कादायक

Amit Kulkarni

2022 निवडणुकीत मयेत गोवा फॉरवर्डचा झेंडा.

Patil_p

लईराईच्या जत्रोत्सवासाठी सोवळे व्रताला प्रारंभ.

Amit Kulkarni