बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात सोमवारी कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळाली. राज्यात बऱ्याच दिवस नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. सोमवारी राज्यात ९९८ बाधित रुग्ण सापडले. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. सोमवारी २,२०९ रुग्ण कोरोनावर विजय मिळवत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात १३ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात सध्या २३,२७९ रुग्ण उपचारात असनू आतापर्यंत १,१७७८ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
दरम्यान राज्यात कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. सोमवारी जिल्ह्यात ४४४ जणांना कोरोनाची लागण झाली. तर १,५०९ लोक कोरोनावर विजय मिळवत घरी परतले. जिल्ह्यात सध्या १७,२४८ रुग्ण उपचारात आहेत. सोमवारी कोरोनाने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयात आतापर्यंत ४,१३७ जण कोरोनामुळे मृत्य पावले आहेत.