Tarun Bharat

कर्नाटकात बुधवारी कोरोनाचे ८,५८० रुग्ण

बेंगळूर/ प्रतिनिधी


कर्नाटकमध्ये कोरोना रुग्ण वाढ सुरूच आहे. बुधवारी राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची ८,५८० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यासह राज्यात एकूण संक्रमितांची संख्या तीन लाखांवर गेली आहे.

कर्नाटकात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ३,००,४०६ वर गेली आहे. त्यापैकी आतापर्यंत २,११,६८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यातील ७,२४९ रूग्णांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात सद्य स्थितीला एकूण ८३,६०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी आणखी १३३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. यासह राज्यात मृतांची संख्या ५,०९१ वर पोहोचली आहे. राज्यात मृत्यूचे प्रमाण १.६९ टक्के आणि रुग्ण बरे होण्याचा दर ७०.४६ टक्के आहे.

Related Stories

संगीतकार रिकी केजचे ग्रॅमी पदक 2 महिन्यांपासून कस्टम विभागाच्या ताब्यात

Abhijeet Khandekar

डी. के. शिवकुमार चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात हजर

Archana Banage

पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींवर नियंत्रण ठेवाः कुमारस्वामी

Archana Banage

…तर खाणींचे परवाने रद्द करणार

Amit Kulkarni

सीईटीसाठी आजपासून अर्ज

Amit Kulkarni

राज्यात दिवसभरात 50 हजारहून अधिक जण कोरोनामुक्त

Amit Kulkarni