Tarun Bharat

कर्नाटकात ‘ब्लॅक फंगस’वर होणार मोफत उपचारः आरोग्यमंत्री

बेंगळूर/प्रतिनीधी

राज्यात ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत आहेत. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी, सरकारी रुग्णालयात आणि ‘आयुष्मान भारत आरोग्य कर्नाटक’ योजनेंतर्गत म्युकरमायकोसिस (‘ब्लॅक फंगस’) वर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. ब्लॅक फंगसचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर राज्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत राज्यभरात १,३७० जणांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाला आहे. तर त्यापैकी ५१ रुग्ण मृत्य पावले आहेत.

दरम्यान, आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (केआयएमएस) च्या अधिकाऱ्यांना त्वरित अधिक म्युकरमायकोसिस रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारी उपकरणे खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Related Stories

राज्यात 5,783 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Amit Kulkarni

बेंगळूर: प्रत्येक मतदारसंघात रुग्णालयांना जागा शोधण्यासाठी समिती गठीत

Archana Banage

मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पूर परिस्थितीची दिली माहिती

Archana Banage

राज्यात उच्चांकी 58,395 जण कोरोनामुक्त

Amit Kulkarni

बेंगळूर: व्ही. के. शशिकला कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

कर्नाटक आणि केरळ सरकारला हायकोर्टाकडून नोटीस

Archana Banage