Tarun Bharat

कर्नाटकात मंगळवारी एक लाख लोकांची कोरोना चाचणी

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना एक महत्वाची बाबा म्हणजे अखेरीस आरोग्य विभागाने एक लाख लोकांच्या कोरोना तपासणीचे लक्ष्य गाठले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के सुधाकर यांनी, मंगळवारी राज्यात १,०४,३३८ लोकांची तपासणी झाली असल्याचे म्हंटले आहे.

मंत्री सुधाकर यांनी राज्यातील तीस जिल्ह्यांमध्ये मंगळवारी एका लाखाहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली असल्याची माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. सुधाकर यांनी ही संख्या लवकरच दीड लाखांवर जाईल असे म्हंटले आहे.

मंगळवारी राज्यात ९,९९३ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या १,१५,१५१ सक्रिय प्रकरणे असून आतापर्यंत ९,४६१ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

कर्नाटक : ‘हे’ सात जण घेणार मंत्रीपदाची शपथ

Abhijeet Shinde

ड्रग्ज प्रकरणः अभिनेत्री संजनाला सशर्त जामीन मंजूर

Abhijeet Shinde

अखेर कॅन्टोन्मेंटच्या पाणी समस्येवर तोडगा

Rohan_P

पूर नियंत्रणासंबंधी जिल्हा प्रशासनांना सूचना

Amit Kulkarni

एसीबीसाठी 120 कोटी खर्च; शिक्षा मात्र चौघांना

Amit Kulkarni

जिल्हाधिकाऱयांचे ग्रामवास्तव्य रद्द

Amit Kulkarni
error: Content is protected !!