Tarun Bharat

कर्नाटकात मंगळवारी कोरोनाचे ७,५७६ नवीन रुग्ण

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. राज्यात मंगळवारी गेल्या चोवीस तासात कोरोना संक्रमणाच्या ७,५७६ नवीन घटनांची नोंद झाली आहे. तर दिलासा देणारी बाब म्हणजे राज्यता एकाच वेळी ८,८६५ रुग्ण बरे झाल्याने रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात ९७ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे ९८,५३६ सक्रिय रुग्ण आहेत. तर मंगळवारी राज्यात ६८,३६५ चाचण्या घेण्यात आल्या.

दरम्यान राजधानी बेंगळूरमध्ये गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ३,०८४ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बेंगळूर शहरी जिल्ह्यात मंगळवारी एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ३९,६८१ वर गेली आहे. तर मंगळवारी ३,८८९ रुग्ण बरे झाल्याने घरी परतले. शहरातील कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत २,५१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तास मध्ये ४१ जणांचा मृत्यू झालं आहे.

Related Stories

कर्नाटक भाजपमध्ये पुन्हा कलह

Archana Banage

बेंगळूर हिंसाचार: समितीकडून मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना अहवाल सादर

Archana Banage

मृत शिक्षकांचा अहवाल तात्काळ सादर करा : शिक्षणमंत्री सुरेशकुमार

Amit Kulkarni

चक्रतीर्थ यांची पाठयपुस्तक समिती रद्द करा : निषेध मोर्चा निदर्शने

Rohit Salunke

जिल्हा प्रशासनातर्फे योग दिन साजरा

Tousif Mujawar

बारावीची परीक्षा लांबणीवर, अकरावीची रद्द

Amit Kulkarni