Tarun Bharat

कर्नाटकात मागील २४ तासात ६७७ नवीन रुग्ण

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात नवीन कोरोना रुग्णसंख्येत दररोज कमी जास्त वाढ होताना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासात ६७७ नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली. याचवेळी १,६७८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घेरी परतले. तर २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.राज्यात सोमवारी दिवसासाठी सकारात्मकता दर ०.६० टक्के होता, तर केस मृत्यू दर (सीएफआर) ३.५४ टक्के होता.

दरम्यान, राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या २९,६८,५४३ झाली आहे. यापैकी २९,१६,५३० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर एकूण ३७,६२७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या १४,३५८ इतकी आहे.

राज्यात सोमवारी नोंदवलेल्या ६७७ नवीन रुग्णांपैकी २१३ रुग्ण बेंगळूर शहरी जिल्ह्यातील आहेत. दम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात सोमवारी ३६२ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

कर्नाटक: बेळगावचा रुग्ण बरे होण्याचा दर सर्वात कमी

Abhijeet Shinde

ड्रग्ज प्रकरण: मंगळूर सीसीबीने टीव्ही अँकर अनुश्रीला बजावली नोटीस

Abhijeet Shinde

कर्नाटकात पहिल्या दिवशी ६२ टक्के लाभार्थ्यांना लसीकरण

Abhijeet Shinde

पोटनिवडणूक निकाल: २ मे रोजी विजयी मिरवणुकीवर बंदी : निवडणूक आयोग

Abhijeet Shinde

कर्नाटक: लसीचे दर निश्चित, जादा शुल्क आकारल्यास होणार कारवाई

Abhijeet Shinde

आरोग्य क्षेत्राला अधिक प्राधान्य द्या

Patil_p
error: Content is protected !!