Tarun Bharat

कर्नाटकात शुक्रवारी नवीन ३६९३ रुग्णांची भर, ११५ जणांचा मृत्यू

बेंगळूर /प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ सुरूच आहे. रुग्णसंख्येबरोबरच बाधितांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. शुक्रवारी राज्यात नवीन ३६९३ रुग्णांची भर पडली. तर ११५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कर्नाटक आरोग्य विभागाने याविषयी माहिती दिली आहे.

राज्यातील कोरोना बहितांचा रिकव्हरी रेट आता खाली घसरून ३७.६६ टक्क्यांवर आला आहे. तर मृत्यूचे प्रमाण २.०५ टक्क्यांवर पोहचले आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत बेंगळूरमध्ये आणखी २२०८ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली, तर शहरात ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी शहरात आता २०६२६ रुग्ण उपचारात आहेत.

Related Stories

ट्रक्टर- क्रूझर अपघातात दोघे ठार

Patil_p

हिडकल जलाशयात सोडली 11 लाख माशांची पिल्ले

Amit Kulkarni

पावसामुळे भाजीपाला दरात वाढ

Patil_p

बॉक्साईट रोडवर धोकादायक खड्डा

Omkar B

‘झंकार’ भित्तीपत्रकाचे उद्घाटन

Amit Kulkarni

शिवसेनेतर्फे लोकमान्य टिळक जयंती साजरी

Tousif Mujawar