Tarun Bharat

कर्नाटकात शुक्रवारी ५९२ रुग्णांचा मृत्यू

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबरच मृतांची संख्याही वाढत आहे. राज्यात शुक्रवारी ५९२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर ४८ हजराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर २८,६२३ रुग्णांनी कोरोनावर मात करत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला आहे. दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनामुळे ३४६ जणांचा मृत्यू झाला तर २१ हजारहून अधिक संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तज्ज्ञांनी दिलेला इशारा शुक्रवारी खरा ठरला, कारण जिल्ह्यांमधील मृत्यू रुग्णांची संख्या ३४६ पर्यंत पोहोचली.

राज्यातील जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटिलेटरने सुसज्ज आयसीयू बेड्सची जास्त मागणी होत असून आरोग्य सुविधेची कमतरता भासत आहे. २७ एप्रिलपासून लागू केलेल्या कर्फ्यू निर्बंधांमुळे अद्याप संक्रमणाच्या साखळीवर परिणाम झालेला नाही. राज्यात सकारात्मकता दर ३०.६९ टक्के होता.

शुक्रवारी नोंदवलेल्या ४८,७८१ रुग्णांपैकी बेंगळूरमध्ये २१,३७६, त्यानंतर तुमकुर ३,०४०, हसन २,४२२, म्हैसूर २,२४६, गुलबर्गा १,७२२, बळ्ळारी १,२८४ रुग्णांची नोंद झाली तर १२० नवीन पॉझिटिव्ह रुग्णांसह चित्रदुर्गाची संख्या सर्वात कमी आहे.

Related Stories

“कर्नाटकची कोरोना तांत्रिक सल्लागार समिती नावापुरतीच”

Abhijeet Shinde

राज्यात भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्याचा संकल्प

Amit Kulkarni

पदवी महाविद्यालये 26 जुलैपासून सुरू

Amit Kulkarni

कर्नाटक : ‘कृषी संजीवनी’ मोबाइल टेस्टिंग लॅब वाहनांचे अनावरण

Abhijeet Shinde

कर्नाटक सरकार बेंगळूरमध्ये ३ कोविड केअर सेंटर सुरु करणार

Abhijeet Shinde

कर्नाटक सरकारला हायकोर्टाचा झटका; ऑनलाईन गेम्सवरील बंदी कायदा रद्द

Abhijeet Shinde
error: Content is protected !!