Tarun Bharat

कर्नाटकात सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखाच्या पुढे

बेंगळूर /प्रतिनिधी

कर्नाटकमधील कोरोना बाधित सक्रिय रूग्णांची संख्या १ लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ९,२१७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४,३०९४७ वर पोहचली आहे. त्यापैकी १,०१,५३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ३,२२,४५४ रुग्णांनी आता पर्यंत कोरोनावर विजय मिळवला आहे.

राज्यात गुरुवारी ७,०२१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे एकूण ६,९३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी गुरुवारी १२९ रुग्णांचा मृत्यू झाला असून ७६८ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. गुरुवारीपर्यंत राज्यात मृत्यूचे प्रमाण १.६० टक्के आणि कोरोनातून बरे होम्याचे प्रमाण ७४.८२ टक्के होते.

राज्यात गेल्या २४ तासात २४,४६८ जलद प्रतिजैविक आणि २९,२४१ आरटी-पीसीआर चाचणीसह एकूण ५४,७०९ नमुन्यांची बुधवारी सायंकाळपासून ते गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चाचणी घेण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ३५,८६,१५० लोकांची तपासणी केली गेली आहे.

Related Stories

कर्नाटक: राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल : आरोग्यमंत्री

Archana Banage

‘या’ तारखेपर्यंत सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण करा : उच्च शिक्षण मंत्री

Archana Banage

कर्नाटकात नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट

Archana Banage

कर्नाटक आणि केरळ सरकारला हायकोर्टाकडून नोटीस

Archana Banage

एकाच अपार्टमेंटमधील 103 जण कोरोनाबाधित

Amit Kulkarni

सेक्स सीडी प्रकरण : विधानसभेत काँग्रेस आमदारांचा गदारोळ

Archana Banage
error: Content is protected !!