Tarun Bharat

कर्नाटकात सोमवारी बाधित रुग्णांच्या संख्येत घट

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली. राज्यात सोमवारी ९९८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा राज्यात घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. सोमवारी १,६०१ रुग्णांनी कोरोनावर मत करत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला. तसेच राज्यात विविध जिल्ह्यातील कोरोनाने ११ जणांचा बळी घेतला. दरम्यान राज्यात २४,७६७ रुग्ण सध्या उपचारात आहेत. तर आतापर्यंत ११,८६७ जणांचा बळी गेला आहे.

राज्यात कोरोना बाधितांची संख्या लक्षत घेता सर्वाधिक संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे.सोमवारी जिल्ह्यात ५०१ जणांना कोरोनाची लागण झाली. तर ८६१ रुग्ण कोरोनावर विजय मिळवत घरी परतले. जिल्ह्यात उपचारात असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. जिल्ह्यात सध्या १९,२६९ रुग्ण उपचारात आहेत. जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात तापर्यंत ४,१९० जण कोरोनामुळे मृत्य पावले आहेत.

Related Stories

ड्रग्ज प्रकरण: मंगळूर सीसीबीने टीव्ही अँकर अनुश्रीला बजावली नोटीस

Archana Banage

कृष्णेच्या पाण्यासाठी संयुक्तपणे लढा

Patil_p

बेंगळूर विमानतळावर २९ व्हेंटिलेटर दाखल

Archana Banage

बेंगळूरमध्ये प्रतिबंधात्मक आदेशाला मुदतवाढ

Archana Banage

कर्नाटकात गुरुवारी ४ हजाराहून अधिक जणांना कोरोनाची बाधा

Archana Banage

केरळ सीमा बंद करणे केंद्राच्या नियमाचे उल्लंघन : उच्च न्यायालय

Amit Kulkarni