Tarun Bharat

कर्नाटकात १५० जागा जिंकण्याचा राहुल गांधींचा निर्धार

ऑनलाईन टीम/तरुण भारत

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काही दिवसापूर्वीच लागला. यामध्ये पाचही राज्यात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या पराभवाचे खापर मात्र राहुल गांधी, सोनिया गांधी (Soniya Gandhi), प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आणि पाच राज्यातील प्रदेशाध्यक्षांच्या माथ्यावर फोडले. यांनतर राहुल गांधींच्या नेतृत्वावरही टीका होऊ लागली. पण काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यासर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत पुन्हा सक्रिय झाले आहेत. राहुल गांधी दोन दिवसांच्या कर्नाटक (karnataka) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप करत कर्नाटकात आपण १५० जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

कर्नाटकात १५० जागा जिंकू
दरम्यान कर्नाटकात आज राहुल गांधी यांनी काँग्रेससाठी 150 हून अधिक जागांचं लक्ष्य ठेवून राज्यात पक्षाच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात केलीय. ते म्हणाले, राज्यात १५० जागांवर विजय मिळाला पाहिजे. त्यापेक्षा एकही जागा कमी असू नये. त्यामुळे प्रत्येकाला आपापली जबाबदारी मनापासून पार पाडावी लागेल. तुम्ही सर्वांनी एकत्र काम करून काँग्रेस पक्षाला १५० जागा जिंकून द्यायच्या आहेत. राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमारब (DK Shivakumar), माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत पक्षाच्या बैठका घेतल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर राहुल गांधी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले असून त्यांनी यावेळी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे.

वाढती बेरोजगारी आणि महागाईवरून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारवर सातत्यानं ते निशाणा साधत आहेत. देशाची अर्थव्यवस्था कोलमडलीय, असं राहुल गांधी यांनी बेंगळूरमध्ये (Bangalore) म्हंटलंय. आपल्या देशात बेरोजगारी आणि महागाई वाढलीय. भाजप लोकांना रोजगार देऊ शकत नाहीय. कारण, त्यांनी रोजगार देणारी क्षेत्रं उद्ध्वस्त केली आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केलाय.

Related Stories

सक्रिय रुग्णसंख्या 14 लाखांवर

Patil_p

कंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थ्यांना दहावी परीक्षा नाही

Tousif Mujawar

अजित पवारांवर शरद पवार विश्वास ठेवत नाहीत- अजयकुमार मिश्रा

Archana Banage

कोरोना : दिल्लीत दिवसभरात 17,558 बाधित; 6,625 ॲक्टिव्ह रुग्ण

Tousif Mujawar

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती; 22 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

datta jadhav

‘धर्मवीर’ चित्रपटातील राजसाहेबांबद्दलचं वाक्य गायब का झालं?; अमेय खोपकर

Abhijeet Khandekar