Tarun Bharat

कर्नाटकात १५ जुलैपासून नवीन शैक्षणिक वर्ष

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात १५ जुलैपासून नवीन शैक्षणिक वर्ष असणार आहे. राज्यात २०२१-२२ शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास किमान ४५ दिवसांनी उशीर होणार आहे.

सार्वजनिक शिक्षण विभागाने २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी १५ जुलै २०२१ रोजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गाडी रुळावर आणण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरु आहे.

विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार दहावी आणि बारावीची परीक्षा मे, जूनमध्ये घेण्यात येईल, हे लक्षात घेता, मूल्यांकनचे काम जूनच्या तिसर्‍या आठवड्यात पूर्ण केले जाईल.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गाचा निकाल जूनअखेरपूर्वी जाहीर करावा आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठी वर्ग सुरू करण्यापूर्वी शिक्षकांना काही दिवसांचा ब्रेक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

राज्य सरकार आणि बीबीएमपीच्या गैरकारभाराविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Abhijeet Shinde

लसीकरणास नकार देणाऱ्यांना कोरोना झाल्यास स्व:खर्चाने उपचार करावे लागणार

Abhijeet Shinde

बीबीएमपी आयुक्तांकडून लसीकरणाचा आढावा

Abhijeet Shinde

कर्नाटक उच्च न्यायालयाचे ‘हे’ आहेत ६ स्थायी न्यायाधीश; एससी कॉलेजियमने दिली मान्यता

Abhijeet Shinde

परिवहन कर्मचाऱयांना 3 महिन्यांचे थकीत वेतन मिळणार

Patil_p

कर्नाटकात कोरोनाच्या अधिक चाचण्या: मंत्री सुधाकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!