Tarun Bharat

कर्नाटकात २४ तासात ३५ हजाराहून अधिक बाधित रुग्णांची भर

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. राज्यात या पूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी सोमवरी १० तारखेपासून सुरु झाली आहे. दरम्यान सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा होत असल्याचे दिसत आहे. राज्यात पूर्ण लॉकडाऊनमुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गुरुवारी राज्यात ३५,२९७ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर ३४,०५७ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. त्याच वेळी, कोरोना संक्रमणामुळे ३४४ रुग्ण मरण पावले.

राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण २७.६४ टक्के होते. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात १५,१९१ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मत केली. गुरुवारी जिल्ह्यात १६,०८४ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला. तर गुरुवारी १६१ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.

Related Stories

बेंगळूर विमानतळ पाणीबचतीत अव्वल

Amit Kulkarni

कोरोनामुळे परिवहनला 4,000 कोटींचा फटका

Amit Kulkarni

”शिखांच्या पगडीला विरोध नाही मग हिजाबला का ?”

Abhijeet Khandekar

कुमारस्वामी यांनी सांगितली माजी पंतप्रधान देवेगौडांची अखेरची इच्छा, म्हणाले…

Abhijeet Khandekar

बेंगळूरमध्ये २३ सक्रिय कंटेनमेंट झोन

Archana Banage

कर्नाटक : काहींना येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदी नको आहेत : मंत्री ईश्वरप्पा

Archana Banage