Tarun Bharat

कर्नाटकाला 17 ते 23 मेपर्यंत 4 लाखांवर रेमडेसिवीरचे वितरण : मंत्री सदानंदगौडा

प्रतिनिधी / बेंगळूर

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने विविध राज्यांना 17 ते 23 मेपर्यंत 2 लाख 30 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण केले आहे. कर्नाटकाला आतापर्यंत 4 लाख 25 हजार रेमडेसिवीरचे वितरण केले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांनी दिली. महाराष्ट्रानंतर कर्नाटकाला अधिक प्रमाणात रेमडेसिवीरचे वाटप करण्यात आले आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या विचारात घेऊन रेमडेसिवीरचे वाटप करण्यात आले आहे. विविध राज्यांना रेमडेसिवीरचे वाटप केल्यासंबंधीची माहिती सदानंदगौडा यांनी रविवारी ट्विटरवरून दिली. 21 एप्रिलपासून आतापर्यंत 76 लाख रेमडेसिवीरचे वाटप करण्यात आले असून यात कर्नाटकाचा वाटा 10 लाख इतका आहे. महाराष्ट्र 14 लाख 92 हजार, दिल्ली 2 लाख 80 हजार, आंध्रप्रदेश 3 लाख 75 हजार, बिहार 2 लाख, केरळ 2 लाख 75 हजार, उत्तरप्रदेश 6 लाख 25 हजार तसेच इतर राज्यांना 76 लाखाहून अधिक रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप केले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Related Stories

ड्रग रॅकेट : दोन चित्रपट कलाकारांची चौकशी, तर एका तस्कराला अटक

Archana Banage

शिवाजी महाराजांचे पूर्वज कन्नड होते : उपमुख्यमंत्री

Archana Banage

कर्नाटकात आतापर्यंत २.८४ लाख कर्मचाऱ्यांना लसीकरण : आरोग्यमंत्री

Archana Banage

बढतीवेळी डावलल्याने आयपीएस रविंद्रनाथ यांचा राजीनामा

Patil_p

बेंगळुरात 350 इलेक्ट्रिक बसेस लवकरच धावणार

Amit Kulkarni

आजपासून नाईट कर्फ्यू ; रात्री १० च्या आधी घरी जा

Archana Banage