Tarun Bharat

कर्नाटक: अंध आणि कर्णबधिर सरकार असंवेदनशील: कुमारस्वामी

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी राज्यसरकारवर बोचरी टीका केली आहे. यावेळी कुमारस्वामी यांनी, वृद्ध, विधवा आणि अपंगांना सहा महिन्यांपर्यंत मासिक पेन्शन देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सरकारला त्यांच्या कामाचा गाजावाजा करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. असे ते म्हणाले. तसेच हे सरकार अंध आणि कर्णबधिर असून असंवेदनशील आहे. सरकारला नागरिकांविषयी कोणतीही सहानुभूती नाही. प्रथम, राज्य सरकारने समस्येचे निराकरण केले पाहिजे आणि पेन्शन देण्याचे आदेश दिले पाहिजेत.

कुमारस्वामी यांनी राज्यात कोरोना संसर्गामुळे परिस्थिती आणखीनच वाईट होत आहे. अशा वेळी सर्वप्रथम साथीवर नियंत्रण ठेवण्याकडेही सरकारने अधिक लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Related Stories

गणेश विसर्जन कुंडात करण्याचे आवाहन

Amit Kulkarni

‘टूलकिट’प्रकरणी बेंगळूरमधून पहिली अटक

Patil_p

सोमवारी कोरोनाचे बारा नवे रुग्ण

Patil_p

अंगडी महाविद्यालयात क्रिएटिव्ह क्लबचे उद्घाटन

Amit Kulkarni

कर्नाटकात ३२ हजार ३८३ सक्रिय रुग्ण

Archana Banage

कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री उडुपी, दक्षिण कन्नड जिल्हा दौऱ्यावर

Archana Banage
error: Content is protected !!