Tarun Bharat

कर्नाटक: आरोग्य विभाग रक्तगटाचे ऑडिट करणार

ए आणि एबी रक्तगटाच्या रूग्णांमध्ये संक्रमणाचा धोका जास्त, डॅनिश आणि कॅनेडियन संशोधकांच्या अभ्यासामध्ये उघड

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोना गंभीर रुग्णांच्या रक्तगटाचे ऑडिट (ए आणि एबी रक्तगटाचे ऑडिट) करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन आंतरराष्ट्रीय अभ्यासात रक्तगट ए आणि एबीच्या रुग्णांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. या अभ्यासाचा गंभीरपणे विचार करून आरोग्य विभागाने ही घोषणा केली आहे.

डेन्मार्क आणि कॅनडामधील अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की ओ रक्त गट प्रकारातील लोकांना संसर्ग होण्याचा धोका कमी असतो. त्यांच्यामध्ये कोरोना परिस्थिती गंभीर किंवा मृत्यू होण्याचा धोकाही इतरांपेक्षा कमी असतो. रक्तगट ए आणि एबी असलेल्या व्यक्तींमध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तथापि, राज्यातील सर्व चिकित्सक या अभ्यासाचे पूर्णपणे पालन करीत नाहीत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आतापर्यंत असा कोणताही अभ्यास केलेला नाही. त्यामुळे राज्य आरोग्य विभागाच्या या लेखापरीक्षणामध्ये अनेक नवीन तथ्य समोर येण्याची शक्यता आहे.

Related Stories

कर्नाटक बंद: ५ डिसेंबर रोजी ऑटो, टॅक्सी सेवा बंद

Archana Banage

सरकारी शाळेतील प्रवेशात लक्षणीय वाढ : मंत्री सुरेशकुमार

Patil_p

कर्नाटकात कोरोना रुग्णवाढीचा वेग वाढला

Archana Banage

माओवाद्यांच्या हालचाली रोखण्यासाठी तामिळनाडू-कर्नाटक सीमेवर सुरक्षा वाढवली

Archana Banage

कर्नाटकात कोरोनाने गाठला एकूण ६ लाख रुग्णांचा टप्पा

Archana Banage

कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक: दोन जागांसाठी मतदान सुरु

Archana Banage