Tarun Bharat

कर्नाटक: एचआयव्ही रूग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत औषधे : आरोग्यमंत्री

बेंगळूर/प्रतिनिधी

एचआयव्ही बाबत खबरदारी घेवून आणि जनजागृती कार्यक्रम वाढवून एचआयव्हीचा प्रसार होण्यापासून रोखले पाहिजे असे प्रतिपादन आरोग्य, कुटुंब कल्याण व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केले. ते मंगळवारी जागतिक एड्स दिना निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते. बेंगळूर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (बीएमसीआरआय) येथे एड्स दिन साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री सुधाकर उपस्थित होते.

दरम्यान एचआयव्ही रूग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांच्या सुविधांचा तपशील देताना मंत्री सुधाकर यांनी आरोग्य केंद्रांना वर्षाकाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत औषधे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही सुविधा एपीएल आणि बीपीएल कार्ड असलेल्या रूग्णांना लागू होते, त्यांनी स्पष्ट केले.

ड्रम,यान २०२० चा विषय आहे ‘एचआयव्ही / एड्सची साथीची समाप्ती: लचीलापणा आणि परिणाम.’ या रोगाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही एकत्र येण्याची गरज आहे. एचआयव्ही आणि एड्सच्या रूग्णांना कलंक लागू नये ,असे ते म्हणाले.
आरोग्य सेवांच्या सुविधांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये एड्सशी संबंधित मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. एचआयव्ही आरोग्य सेवेमुळे 99 वर्षांचे रूग्णही निरोगी आयुष्य जगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत-आरोग्य कर्नाटक यांच्यामार्फत मोफत वैद्यकीय सुविधांसह हे शक्य केले आहे, असे मंत्री सुधाकर म्हणाले.

कर्नाटकात २८० एचआयव्ही बाधित लोकांना कोरोनाचा आजार झाला, असे आरोग्यमंत्री म्हणाले. तथापि, कोरोनाचा संसर्ग झाल्यास एचआयव्ही बाधित झालेल्या लोकांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते या भीतीच्या विपरीत, २८० पैकी २७५ लोक जिवंत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Related Stories

बेंगळूर येथे काँग्रेसकडून इंधन दरवाढीचा निषेध

Archana Banage

राज्य मंत्रिमंडळ विस्तार ग्रा. पं. निवडणुकीपूर्वी?

Patil_p

उद्यापासून बेंगळूरमध्ये कोणत्याही प्रकारचा लॉकडाउन नाहीः मुख्यमंत्री येडियुरप्पा

Archana Banage

आमदार मुनिरत्न यांना न्यायालयाचा दिलासा

Amit Kulkarni

प्रेस क्लब ऑफ बेंगळूर पुरस्कारासाठी अझीम प्रेमजी आणि डॉ. देवी शेट्टी यांची निवड

Archana Banage

‘ऐतिहासिक निर्णय’: बी.एस.येडियुरप्पा यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

Abhijeet Khandekar