Tarun Bharat

कर्नाटक कायदा सेवा प्राधिकार सदस्यपदी डॉ. विनोद गायकवाड

प्रतिनिधी / बेळगाव

येथील राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख आणि कला शाखेचे डीन प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांची नियुक्ती कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकारचे सदस्य म्हणून झाली आहे. कर्नाटक सरकारने ही नियुक्ती केली असून ती तीन वर्षांसाठी आहे.

सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी कायदा सेवा प्राधिकार कार्यरत आहे. या मंडळावर समाजातील विविध स्तरातून समाजशील व्यक्तींची निवड करण्यात येते. प्राधिकारची ध्येयधोरणे अधिक परिणामकारकतेने राबविण्याची जबाबदारी सदस्यांवर आहे.

डॉ. विनोद गायकवाड हे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. या कार्यकाळात त्यांनी अनेक कामे केली. याची नोंद घेऊन सरकारने ही निवड केली आहे.

Related Stories

वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे 35 ज्येष्ठ विक्रेत्यांचा सत्कार

Omkar B

दुहेरी खुनाने मच्छे हादरले…

Tousif Mujawar

इशारा देऊनही रस्त्यावर कचरा टाकण्याचा प्रकार

Amit Kulkarni

सेक्टर अधिकाऱ्यांना पोस्टल बॅलेटबाबत सूचना

Amit Kulkarni

घरफोडय़ा-चोरीप्रकरणी दोघा जणांची चौकशी

Omkar B

बाजारपेठेतील खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni