Tarun Bharat

कर्नाटक केएसईटी २०२१ परीक्षेची तारीख जाहीर

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

म्हैसूर विद्यापीठाने गुरुवारी कर्नाटक राज्य पात्रता परीक्षा (केएसईटी) २०२१ च्या परीक्षेची तारीख जाहीर केली. केएसईटी २०२१परीक्षा २५ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. केएसईटी परीक्षा सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी घेण्यात येईल.

कोरोना कारणास्तव परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. सुधारित तारीख २५ एप्रिल आहे. समन्वयक अधिकारी प्रा. एच. राजशेखर यांनी अशी माहिती दिली की सर्व जिल्हा उपायुक्त, संबंधित सरकारी कर्मचारी आणि जिल्हाभरातील पोलीस परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करतात, असे अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे. केएसईटी २०२१ परीक्षा कर्नाटकमधील ११ केंद्रांवर घेण्यात येईल. उमेदवारांना त्यांच्या रोल नंबरच्या आधारे एक केंद्र वाटप करण्यात येईल.

उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोविड-प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान परीक्षेवेळी प्रवेशपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे. परीक्षा सुरू होण्याच्या वेळेच्या ३० मिनिट अगोदर परीक्षा केंद्रे उघडली जातील.

Related Stories

कर्नाटक: राज्यात सोमवारी बाधितांच्या संख्येत घट

Abhijeet Shinde

सोलापूरमध्ये ‘चेस दि व्हायरस’ प्रभावीपणे राबवा : मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचे सुप्रीम कोर्टानेही केलं कौतुक

datta jadhav

पद्म पुरस्कार विजेत्याचा मुलीवर बलात्कार, गुन्हा दाखल

Sumit Tambekar

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

Rohan_P

कर्नाटकात शुक्रवारी ५९२ रुग्णांचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!