Tarun Bharat

कर्नाटक: कोणताही आमदार पक्ष सोडून जाऊ शकतो : शिवकुमार

Advertisements

मंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी कॉंग्रेसचा कोणताही आमदार पक्ष सोडू शकतो. कोणत्याही आमदाराला थांबवून ठेवलेले नाही. सर्वांना सोबत घेऊन पक्ष बळकट करणे हे त्यांचे उद्दीष्ट आहे, असे ते म्हणाले.

तसेच काँग्रेसचे किती आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, याचा तपशील भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांना द्यावा लागेल. फक्त खोटे बोलून काहीच होणार नाही. त्यामुळे ते असेही खोटे बोलू शकतात की दोन डझनभर आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांना कटील यांच्यासारखे बिनकामाची प्रसिद्धी नको आहे. असे डी. के. शिवकुमार यांनी म्हंटले आहे.

कोणत्याही आमदाराला थांबवून ठेवलेले नाही
शिवकुमार यांनी आपण कोणत्याही आमदाराला थांबवले नाही. कोणताही आमदार पक्ष सोडून जाऊ शकतो. देशभरात भाजप काय करीत आहे? सर्व नागरिक ते पहात आहेत. भविष्यात भाजपला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. असे त्यांनी म्हंटले आहे.

सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्ष बळकट करतील. ते राज्यातील सर्व जिल्हा व तहसीलांना भेट देत आहेत. काँग्रेस मागून सरकार स्थापन करण्याऐवजी थेट निवडणुकीला सामोरे जाणे पसंत करेल. असे डीके शिवकुमार यांनी म्हंटले आहे.

काँग्रेस पक्ष राज्यातले भाजप सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. पण, भाजपमध्ये मतभेद सुरू झाले आहेत. मंत्रीपद आणि विविध महामंडळे आणि बोर्डाचे अध्यक्ष यांच्यात मतभेद सुरू झाले आहेत. असे शिवकुमार म्हणाले.

Related Stories

शाळांमध्ये अंडी वितरणाला सुरुवात

Amit Kulkarni

रक्षक कॉलनी जिजाऊ महिला मंडळातर्फे हिंडलगा महालक्ष्मीसाठी चांदीचे मुकुट सुपूर्द

Amit Kulkarni

राज्याला कोव्हॅक्सिनचे 1.25 लाख डोस उपलब्ध

Amit Kulkarni

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मेंढय़ा विक्रीला अल्प प्रतिसाद, मेंढपाळ चिंताग्रस्त

Rohan_P

शनिवारीही शहरासह ग्रामीण भागात वळीव

Patil_p

हिंडलग्यात मासिक बैठक घेण्यास सदस्यांचा विरोध

Omkar B
error: Content is protected !!