Tarun Bharat

कर्नाटक: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १३० शिक्षकांच्या नातेवाईकांना मिळणार नोकरीची संधी

बेंगळूर/प्रतिनिधी

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना कर्तव्यावर असताना अनेक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातून काही रुग्ण बरे झाले तर काही जणांचा बळी गेला. यामध्ये राज्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या १३० शिक्षकांच्या नातेवाईकांना सेवेत सामावून घेण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी नियुक्तीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी गुरुवारी कोरोना आणि अन्य आजारांमुळे मृत्यू झालेल्या १३० शिक्षकांच्या नातेवाईकांना त्यांच्या सेवेदरम्यान अनुकंपाखाली नियुक्तीचे आदेश दिले.१३० जणांना नियुक्ती आदेशाच्या प्रती देताना कुमार म्हणाले की त्यांच्या मृत्यूमुळे शिक्षण विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी दिलेले योगदान मोठे असून ते कधीही न विसरणार आहे.

दरम्यान, कोरोना कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होऊन अनेक जण कोरोनाचे शिकार झाले. कोरोनाकाळात आणि आजही आरोग्य कर्मचारी, शिक्षक, आशा सेविका, सेवाभावी संस्था आणि अन्य सरकारी कर्मचारी काम करत आहेत.

Related Stories

बेंगळूर : व्ही.के. शशिकला यांची चार वर्षांच्या तुरूंगवासानंतर सुटका

Archana Banage

कर्नाटकात मंगळवारी १,८७० बाधितांची नोंद

Archana Banage

सीमाप्रश्नावरील सुनावणी लांबणीवर

Abhijeet Khandekar

कर्नाटक: दुसर्‍या दिवशी बेमुदत संपाचा पवित्रा कायम

Archana Banage

कर्नाटकात नवीन ४१९ बाधितांची भर

Archana Banage

रेशन तांदळाच्या अवैध तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश ; २ आरोपींची अटक

Rohit Salunke