Tarun Bharat

कर्नाटक: कोरोनामुळे ३०० हून अधिक सरकारी कर्मचारी दगावले

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरीही लाट भयंकर असल्याचे दिसत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर कोरोना मृतांची संख्याही वाढत आहे. दरम्यान, देशात कर्नाटक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. तसेच कोरोना काळात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अनेक कर्मचारी कोरोनामुळे मृत पावले आहेत. सरकारी कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे कोविड -१९ संसर्ग होण्याची तीव्रता दर्शविण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने (केएसजीईए) म्हटले आहे की राज्यात ३०० पेक्षा जास्त सरकारी कर्मचार्‍यांचा कोरोना विषाणूने बळी गेल्याचे म्हंटले आहे.

केएसजीईएचे अध्यक्ष सी. एस. शादक्षरी यांनी माध्यमांशी बोलताना, बहुतेक कर्मचार्‍यांना घराबाहेर काम करण्यास सांगण्यात आले असले तरी, प्राथमिक आणि माध्यमिक शालेय सरकारी शिक्षकांपैकी ३०० हून अधिक कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणात विष्णूचा संसर्ग झाल्यामुळे आपला जीव गमवावा लागला, असे त्यांनी सांगितले.

अध्यापन समुदायाला मोठ्या प्रमाणात विषाणूचा त्रास झाला आहे. साथीच्या आजाराने सुमारे २५० प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. बेंगळूर आणि गुलबर्गा विभागातील शिक्षकांना या विषाणूचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून या दोन प्रभागांमधील सुमारे १५० शिक्षक कोरोनामुळे दगावले आहेत, असे सरकारच्या सूत्रांनी सांगितले.

बर्‍याच शिक्षकांच्या मृत्यूबद्दल, कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे सरचिटणीस चंद्रशेकर नुगळी यांनी, असोसिएशनने शिक्षकांना उपचार देण्यासाठी सरकारी रुग्णालयात १० टक्के बेड राखून ठेवण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, एकट्या विजयपुरा जिल्ह्यात विषाणूची लागण झालेल्या ५३ शिक्षकांचा मृत्यू झाला होता, असे म्हंटले आहे.

Related Stories

भाजपचे १५ आमदार बंडाच्या पावित्र्यात

Archana Banage

कर्नाटकची पुराचा सामना करण्यासाठी केंद्राकडे ४ हजार कोटींची मागणी

Archana Banage

विकेंड कर्फ्यूत अत्यावश्यक सेवा, उद्योगांनाच मुभा

Amit Kulkarni

१२७ टन ऑक्सिजनसह २९ वी ऑक्सिजन एक्सप्रेस बेंगळुरात दाखल

Archana Banage

कर्नाटक: केसीईटीचा निकाल २० ऑगस्टला

Archana Banage

डी. के. शिवकुमारांचे बंधू कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage
error: Content is protected !!