Tarun Bharat

कर्नाटक : कोरोना परिस्थिती नियंत्रित ठेवण्यात भाजप सरकार अपयशी : सिद्धरामय्या

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी गुरुवारी राज्यातील येडियुरप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणारे सरकार कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यात आणि प्रभावीपणे यंत्रणा राबविण्यात अपयशी ठरल्याचे काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांनी टीका केली आहे.

ट्वीटच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालये बेड उपलब्ध असूनही रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देत नाहीत. तसेच उपचार शुल्क जास्त प्रमाणात आकारतात. सरकार त्यांचे नियमन लागू करण्यात अपयशी ठरले असे म्हंटले आहे.

त्यांनी पुढे राज्यातील कोरोना वाढीचे प्रमुख कारण म्हणजे सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीची निराशाजनक स्थिती असल्याचे नमूद केले. राज्यात सुविधांचा अभाव असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारी रुग्णालयांवर लोकांचा विश्वास नाही आणि खासगी रुग्णालयांना पैसे देण्यास त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे त्यांची चाचणी व उपचार होत नाहीत, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Related Stories

कर्नाटक: दुसऱ्या लाटेत २८ डॉक्टरांनी गमावला जीव : आयएमए

Archana Banage

कर्नाटक विधानसभेचे सत्र १० फेब्रुवारीपर्यंत

Archana Banage

कर्नाटकातील आंबा पिकाला खराब हवामानाचा फटका

Abhijeet Khandekar

कर्नाटक: नवीन पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५४ टक्के रुग्ण बेंगळूर मधील

Archana Banage

बेंगळूर ‘लॉकडाऊन’बाबत आज निर्णय

Amit Kulkarni

कर्नाटक : मुख्यमंत्र्यांच्या माध्यम सल्लागारांना मंत्रीपदाचा दर्जा देण्याचे निर्देश

Archana Banage