Tarun Bharat

कर्नाटक : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत सतत चढ-उतार

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत चढ-उतार होत आहे. राज्यात मंगळवारी १,३३६ नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले होते. परंतु बुधवारी ही संख्या वाढून १,७९१ झाली. यासह राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या ८,६५,९३१ वर पोहोचली आहे. यापैकी ८,२९,१८८ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान राज्यात बुधवारी १,९४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य विभागाने बुधवारी २१ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. दरम्यान राज्यात सध्या २५,१४६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत ११,५७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. आता ६३६ रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत राज्यातील कोरोना सकारात्मकता दर १.८४ टक्क्यांवर होता आणि मृत्यू दर १.१७ टक्के होता.

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोना चाचणीची संख्या एक लाखाहून कमी आहे. बुधवारीही २८,७०३ जलद प्रतिजैविक आणि ६८,३३९ आरटी-पीसीआर चाचण्यांसह एकूण ९७,०४२ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. बुधवारपर्यंत राज्यात ९७,४१,०५१ हून अधिक कोविड नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.

Related Stories

राज्यातील 39 कारागृहे कोरोनामुक्त

Amit Kulkarni

1 जुलैपासून शाळा होणार सुरू

Patil_p

अनलॉक 3.0 ची घोषणा आज?

Patil_p

बेंगळूर : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन तरुणांना अटक

Archana Banage

“मराठा इतिहास रचतो,” नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन

Archana Banage

देशातील ‘या’ राज्यात जुन्या वाहनांची संख्या सर्वाधिक

Archana Banage